
नाशिक : केंद्रशासन आणि पोलिसांकडून वारंवार सायबर फसवणुकीबाबत जनजागृती करीत असताना, शहरात एका निवृत्त ज्येष्ठ नागरिकाला कुरिअरमधून एमडी ड्रग्ज आल्याप्रकरणी ‘डिजिटल होम अरेस्ट’ करीत तब्बल २७ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगाव परिसरातील कोणार्कनगर परिसरात राहणारे ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे संरक्षण दलाच्या एका कंपनीचे निवृत्त कर्मचारी आहेत.