Nashik Shivnika Sansthan Scam
esakal
नाशिक : वासनांध कॅप्टन अशोक खरात याच्या मिरगाव येथील ‘श्री शिवनिका संस्थान’च्या उत्पन्नात गेल्या काही वर्षांमध्ये तब्बल ७४ पटींनी वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर (Nashik Shivnika Sansthan income growth investigation) आली आहे. संस्थाननेच धर्मादाय आयुक्तालयाकडे सादर केलेल्या लेखापरीक्षणातून ही बाब उघड झाली असून, अचानक वाढलेल्या उत्पन्नामुळे संस्थानमधील आर्थिक व्यवहाराविषयी संशय व्यक्त होत आहे.