
सिडको : गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाटीलनगर ते बडदेनगर डीपी रस्त्याच्या डांबरीकरणास प्रारंभ झाला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंद आणि समाधानाचा सूर आहे. या कामाची मागणी अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक करत होते, परंतु ते पूर्ण होण्यास विलंब होत होता. यासंदर्भात ‘सकाळ’ ने वारंवार बातम्यांच्या माध्यमातून या रस्त्याचा प्रश्न समोर आणला होता. त्याबद्दल नागरिकांनी ‘सकाळ’चे आभार मानले आहेत.