
नाशिक : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेल्या व ऐनवेळी तुतारी हाती घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गणेश गिते आणि भाजपचे विद्यमान आमदार अॅड. राहुल ढिकले यांच्यात सरळ लढत होणार असली, तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रसाद सानप यांच्या उमेदवारीने तिरंगी लढत होणार असल्याने चुरस वाढली. १५ उमेदवारांपैकी केवळ भाऊसाहेब निमसे व नीलेश मगर या दोन अपक्षांनी माघार घेतल्याने एकूण १३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. (assembly election 2 independents won three way contest in East 13 candidates are in fray )