Nashik Assembly Election : 8 महिन्यांत 2 लाख 59 हजार मतदार वाढले; विधानसभा निवडणुकीची मतदारयादी अंतिम

Assembly Election : विधानसभेच्या आगामी निवडणुकीची अंतिम मतदारयादी जाहीर झाली असून, जिल्ह्यात ४९ लाख ८२ हजार मतदार आहेत.
Assembly Election
Assembly Electionsakal
Updated on

Nashik Assembly Election : विधानसभेच्या आगामी निवडणुकीची अंतिम मतदारयादी जाहीर झाली असून, जिल्ह्यात ४९ लाख ८२ हजार मतदार आहेत. विशेष म्हणजे गेल्या आठ महिन्यांत दोन लाख ५९ हजार नवमतदारांची नोंद झाली आहे. दोन हजार ८५९ दुबार नावांसह विविध कारणांनी ३४ हजार ३२७ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा निवडणूक विभागाने गुरुवारी (ता. २९) जिल्ह्याची अंतिम मतदारयादी जाहीर केली. (Assembly Election 2 lakh 59 thousand voters increased in 8 months )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com