
किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा
Nashik Congress : महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर १९६२ मध्ये झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील सर्व बारा जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. दमदारपणे सुरू झालेल्या कामगिरीला १९८५ पासून लागलेली उतरंड आजतागत कायम आहे. सर्वाधिक जागा जिंकणारा काँग्रेस २०१९ च्या निवडणुकीत एका जागेपर्यंत सीमित झाला. यंदाच्या निवडणुकीत या एकमेव आमदारानेही पक्षाला ‘हात’ दाखवल्यामुळे कधीकाळी सर्वाधिक जागा जिंकणारी काँग्रेस सद्यःस्थितीला शून्यापर्यंत घसरली आहे. (Congress won most seats in district to zero)