
सिन्नर : सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांचा ४०८८४ आघाडी मतांनी विजय झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उदय सांगळे यांचा त्यांनी पराभव केला. माणिकराव कोकाटे हे पाचव्यांदा विधानसभेत पोहोचले असून गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत त्यांना मतदारांनी भरभरून मते दिल्याचे दिसून आले.