Nashik Vidhan Sabha Election : मालेगावला 24 मतदान केंद्र वाढले; मध्यला 3 तर बाह्यमध्ये 21 मतदान केंद्र वाढले

Latest Vidhan Sabha Election News : विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजताच मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील प्रशासकीय यंत्रणा कार्यरत झाली आहे.
Vidhan Sabha Election
Vidhan Sabha Electionesakal
Updated on

मालेगाव : विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजताच मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातील प्रशासकीय यंत्रणा कार्यरत झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेने मालेगाव मध्यमध्ये ३ तर बाह्य मध्ये २१ मतदान केंद्रांची संख्या वाढली आहे. मालेगाव मध्यमध्ये ३ लाख ३९ हजार ८२३ तर मालेगाव बाह्यमध्ये ३ लाख ७६ हजार २५७ मतदार आहेत. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघासाठी लोकसभा निवडणुकीसाठी ३ लाख ६० हजार ८१५ मतदार व ३३१ मतदान केंद्र होते. (Assembly Election 24 polling stations have been increased in Malegaon city)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com