Prime Minister Narendra Modi, Sharad Pawar, Uddhav Thackeray, Sanjay Raut, Raj Thackeray, Nitin Bangudeesakal
नाशिक
Nashik Vidhan Sabha Election: जिल्ह्यात प्रचारसभांचा उडणार धुरळा; पंतप्रधान मोदींसह प्रमुख नेत्यांच्या सभेमुळे निवडणुकीचा ज्वर वाढणार
Latest Vidhan Sabha Election News : जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांच्या प्रचाराचा ज्वर वाढू लागला आहे.
नाशिक : जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांच्या प्रचाराचा ज्वर वाढू लागला आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय व राज्यस्तरावरील प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभांचा जिल्ह्यात धुरळा उडणार आहे. यामुळे निवडणुकीचा ज्वर वाढणार आहे. पंतप्रधान मोदी यांची ८ नोव्हेंबरला दुपारी बाराला जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येथील मोदी मैदानावर सभा होणार आहे. (assembly election fever will increase due to meeting of major leaders with Prime Minister Modi)