
नाशिक : राज्यात महायुतीला विक्रमी बहुमत मिळाले. नाशिक जिल्ह्याचा कलही महायुतीचे बाजूने दिसून आला. जिल्ह्यात दिंडोरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, भाजपच्या नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे व चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर या चौघांनी हॅट्ट्रिक साधत नवा विक्रम केला आहे.