
नाशिक : विभागीय आयुक्तालयात पक्षकाराच्या बाजूने निकाल लावून देण्याच्या मोबदल्यात तीस हजारांची लाच मागितल्याप्रकरणी संशयित महसूल सहाय्यकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास पाराजी वैरागे (वय ५१, रा. शिवदर्शन सोसायटी, नाशिक रोड कोर्टाच्या मागे, नाशिक रोड) असे महसूल सहाय्यकाचे नाव आहे. तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून, त्यांचे पक्षकाराचा विभागीय आयुक्त कार्यालयात पुनर्निरीक्षण दावा दाखल होता.