
नाशिक : चोरीच्या नळांचे वॉल भंगारात खरेदी करणाऱ्या व्यावसायिकाला गुन्ह्यात सुटका करण्यासाठी लाच मागणाऱ्या सहाय्यक उपनिरीक्षकाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करत त्याब्यात घेतले. राजेंद्र सोपान घुमरे असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून, शुक्रवारी (ता.२७) त्यांच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संशयित घुमरे हे गुन्हे शाखा युनिट दोनमध्ये सहाय्यक उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते.