Fraud Crime
Fraud Crimeesakal

Nashik Fraud Crime : लासलगाव दामदुप्पट योजनेतील गुंतवणूकदाराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न

Latest Crime News : स्टार इन्स्पायर ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड फर्ममध्ये ५० ते ६० दिवसांत दामदुप्पट योजनेमध्ये गावातील तरुणाने नातेवाईक व मित्रपरिवारासह गुंतवणूक केली.
Published on

लासलगाव : येथील स्टार इन्स्पायर ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड फर्ममध्ये ५० ते ६० दिवसांत दामदुप्पट योजनेमध्ये गावातील तरुणाने नातेवाईक व मित्रपरिवारासह गुंतवणूक केली. ती परत न मिळाल्यामुळे बुधवारी रात्री गुंतवणूकदाराच्या ग्रुपवर सर्वांना ‘माझा शेवटचा नमस्कार, मी जे काही स्वप्न पाहिले होते ते सतीश काळेमुळे...’ असा मेसेज करत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोन दिवस अगोदर एका तरुणाने स्वतः व अनेकांची रक्कम अडकविल्यामुळे माडसांगवी येथे विहिरीत उडी मारत जीव दिल्याची घटना आडगाव पोलिस ठाणे हद्दीत घडल्याची चर्चा आहे. (attempt by investor in Lasalgaon double money scheme to take extreme step)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com