Nashik News : खळबळजनक! प्रेमसंबंधातून महिलेने घेतली मनगटाची नस कापून; सातपूर पोलिसांनी केले रुग्णालयात दाखल

Nashik News : सातपूर पोलिसांनी बेशुद्ध अवस्थेतील महिलेला सातपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले असून, याप्रकरणी सातपूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
women
womenesakal

Nashik News : सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथे राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेने प्रेमसंबंध आणि कौटुंबिक कलहातून स्वत:च्या मनगटाची नस कापून घेतली आणि तक्रार देण्यासाठी सातपूर पोलिसात ठाण्यात आली. त्यावेळी सातपूर पोलिसांनी बेशुद्ध अवस्थेतील महिलेला सातपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले असून, याप्रकरणी सातपूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. (Nashik Attempt to end life by married women )

मनिषा पाटील (४०, रा. शिवाजीनगर, सातपूर) असे या महिलेचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी (ता ९) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास या महिलेने सातपूरमधील स्टारलाईट कंपनीसमोर रस्त्यावर स्वत:च्या हाताच्या मनगटाजवळ ब्लेडने नस कापून घेण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर ती सातपूर पोलिस ठाण्याकडे येत असतानाच ठाण्याबाहेर बेशुद्ध होऊन पडली. यावेळी पोलिसांनी धाव घेत तिला सातपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिचे नातलगही रुग्णालयात दाखल झाले. याप्रकरणी रुग्णालयाकडून सातपूर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलीसात नोंद करण्यात आली आहे. (latest marathi news)

women
Crime News : महिलांशी असभ्य वर्तणूकही भोवली! तळेगावचे मुख्याधिकारी पाटील निलंबित

चिठ्ठी सापडली

दरम्यान, मनिषा हिचे महिले लग्न झाले असून, सध्या ती प्रतिक नामक व्यक्तीशी तिचे प्रेमसंबंध आहेत. त्याने तिच्याकडून काही पैसेही घेतले आहेत. परंतु प्रतिक याच्या घरातील सदस्य तिला त्रास देतात. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू आहेत.

याच वादातून तिने आपले जीवन संपविण्यासाठी स्वत:ची नस कापून घेत आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याची चिठ्ठी लिहिली आहे. सदरील चिठ्ठी सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मनिषा हिला रुग्णालयात दाखल केले असता, प्रतिकसह कुंटूंबियांनी रुग्णालयात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

women
Crime: बापपणाला कलंक ! वडिलांनीच केला पोटच्या पोरीवर अत्याचार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com