Nashik: ZPच्या छतावर चढून युवकाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न! अचानक घडलेल्या प्रकारामुळे मुख्यालयात उडाली धांदल

Nashik News : तब्बल अर्धा तास पोलिस कर्मचाऱ्यांकडून त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
Men Climbing on ZP office
Men Climbing on ZP officeesakal

नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी एका युवकाने मुख्यालयाच्या छतावर जात अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याची धमकी दिली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे मुख्यालयात एकच धांदल उडाली. या वेळी कर्मचाऱ्यांसह बघ्यांनी मोठी गर्दी केली.

तब्बल अर्धा तास पोलिस कर्मचाऱ्यांकडून त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अखेर भद्रकाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी घटनास्थळी दाखल होत हस्तक्षेप केला अन् त्यास छतावरून उतरून घेतले. त्यानंतर त्या युवकाला पोलिस ठाण्याला घेऊन गेले. अनिकेत निकाळे (वय २३, रा. मल्हार खान, गंगापूर रोड) असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. (Nashik attempt to end life youth ZP office marathi news)

जिल्हा परिषदेच्या मुख्यालय आवारात निकाळे या युवकाने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या दालनात जाऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. संबंधित युवकास मित्तल यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्याने भद्रकाली पोलिस ठाण्यात धाव घेतली अन् मित्तल यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार केली.

या तक्रारींची दखल घेऊन पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने चौकशी करत आपला अहवाल सादर केला. यात कोणतेही तथ्य नसल्याचे नमूद केले. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. मात्र, गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी संबंधित युवक दररोज मुख्यालयात येऊन तगादा लावत होता.

त्या वेळी संबंधित युवकांशी अनेक अधिकाऱ्यांनी संवाद साधत त्याची समजूत घालण्याचा प्रयत्नदेखील केला. मात्र, युवक मागणीवर ठाम होता. त्यामुळे भद्रकाली पोलिस ठाण्याच्या वतीने १५ दिवसांपासून मुख्यालयात पोलिस देखील तैनात केले होते. निकाळे या युवकाने सोमवारी (ता. २६) मित्तल यांची भेट घेतली.

त्यांनी निकाळे युवकाची समजूत घालण्याचा पुन्हा प्रयत्न केला. परंतु तो मागणीवर ठाम होता. चर्चेतून तोडगा न निघाल्याने निकाळे याने मित्तल यांच्या दालनाबाहेर पडल्यानंतर मुख्यालयाच्या छतावर चढला. त्या वेळी त्यांच्या हातात पेट्रोलची बाटली होती. माझ्यावर अन्याय होत असल्याची ओरड या वेळी तो करत होता. (Latest Marathi News)

Men Climbing on ZP office
Latest Marathi News Live Update: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांचं भीमटोला आंदोलन

याप्रसंगी मुख्यालयाबाहेर लोकांची मोठी गर्दी झाली होती. मुख्यालयात दाखल झालेल्या पोलिसांकडून अर्धा तास त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, तो न्याय द्यावा, अशी मागणी करत होता. अखेरीस भद्रकाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दाखल होऊन त्यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यास खाली उतरविले. त्यानंतर निकाळे युवकास पोलिस ठाण्याला घेऊन गेले.

"निकाळे याला यापूर्वी वेळोवेळी समज देण्यात आली आहे. त्यांच्याशी संवाद साधत समजूतदेखील घातली होती. आत्मदहनाचा प्रयत्न करणे, हा गुन्हा आहे. त्याच्यावर यापूर्वी देखील आत्महत्येचा प्रयत्न आणि खंडणी, असे गुन्हे दाखल आहेत."

- संतोष नरुटे, पोलिस निरीक्षक, भद्रकाली पोलिस ठाणे

"जिल्हा परिषदेच्या इमारतीवर चढत हातात ज्वलनशील पदार्थ घेऊन एका व्यक्तीने नागरिकांचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. मी आत्महत्या करेल असे ते वारंवार म्हणत, असे कळाले. सदर व्यक्ती दोन महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाशी निगडित तक्रार घेऊन आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाहीदेखील झालेली असून, त्यांचा जिल्हा परिषदेशी संबंधित एकही मुद्दा प्रलंबित नाही. तरी देखील सदर व्यक्ती हे दररोज जिल्हा परिषदेत येऊन विनाकारण आरडाओरड करत होती. या संदर्भात पोलिस प्रशासनाला यापूर्वी पत्र देखील देण्यात आले आहे. झालेला प्रकार हा गंभीर असून, यासंदर्भात पोलिस कारवाई करत गुन्हा दाखल करण्याबाबतचे निर्देश सामान्य प्रशासन विभागास दिले आहेत."

-आशिमा मित्तल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद)

Men Climbing on ZP office
Loksabha Election : महायुतीमध्ये शिंदे गटाचा लोकसभेसाठी 18 जागांसाठी आग्रह!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com