NSK26H33827
नाशिक ः ग्रामपंचायत विभागाच्या अटेंडन्स ॲपचे उदघाटन करताना विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम. समवेत सीईओ ओमकार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ.
…
ग्रामपंचायत अधिकारींना
आता ‘अटेंडन्स अॅप’
नाशिक, ता.२८ : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागांतर्गत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांसाठी ‘अटेंडन्स अॅप’ विकसित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते करण्यात आले.
अॅपमध्ये चेहऱ्याची ओळख या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद अधिक अचूक आणि विश्वासार्ह पद्धतीने करता येणार आहे. प्रत्येक उपस्थिती नोंदीसोबत छायाचित्र आणि वेळेची नोंद उपलब्ध राहणार असल्याने उपस्थिती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यास मदत होणार आहे. उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, विहंग देशमुख, चंद्रा बॅनर्जी तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. या प्रणालीमुळे अधिकाऱ्यांच्या कामकाजातील नियमितता, शिस्त आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी, ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांना विविध शासकीय सेवा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे. मोबाईलवर वापरता येणाऱ्या या अॅपमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने बायोमेट्रिक लॉकची सुविधा देण्यात आली आहे. इंटरनेट उपलब्ध नसतानाही अॅप वापरण्याची सुविधा असल्याने ग्रामपंचायत स्तरावर उपस्थिती नोंदविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.