
देवळाली कॅम्प : कोरोना महामारीमुळे रखडलेल्या खुल्या लष्कर भरती प्रक्रियेला देवळालीच्या शिंगवे बहुला रोडवरील ११६ टीए पॅरा बटालियनद्वारे ८१ सैनिक व ५७ ट्रेडमन पदाकरिता भरतीला सुरवात झाली. भरतीच्या पहिल्याच दिवशी तेलंगण, गुजरातसह केंद्रशासित प्रदेशातील तरुणांना संधी देण्यात आली होती. सोमवारी (ता. ४) सुमारे ३ हजार तरुण दाखल झाल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, भरतीसाठी आलेल्या तरुणांमुळे शहरातील उपाहारगृहांमध्ये गर्दी होत आहे. (Attendance of more than 3,000 youths for army recruitment crowd at bus stand railway platform to sleep )