नाशिक - विश्रांती घेतलेल्या अवकाळी पावसाने सोमवारी (ता. १९) जिल्ह्याच्या पूर्व भागाला जोरदार दणका दिला. सिन्नर तालुक्याचा पूर्व भाग, कसबे-सुकेणे परिसर, तसेच येवल्याच्या उत्तर भागात वादळासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात कोपरगाव रस्त्यावर झाड पडल्याने अर्धा ते पाऊण तास वाहतूक ठप्प झाली होती.