
सातपूर : जिल्ह्यातून सर्वांत जास्त कांदा व द्राक्षे यांची निर्यात होत असून, जगाच्या नकाशावर कांदा निर्यातीत नाशिकचे मोठे नाव आहे, असे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. तसेच, जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी निर्यात वाढ होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.