
Nashik Potholes : दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांवरील खड्डे उघडे पडले आहे. महापालिकेच्या खड्डे बुजविण्याच्या कामाचे पावसाने पितळ उघडे केले आहे. खड्डे बुजविण्यासाठी वापरलेली कच, माती वाहून गेल्याने खड्ड्यांना मूळ स्वरूप आले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाने उपनगरासह विविध भागातील मुख्य रस्त्यांना खड्डे पडले होते. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती. प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होताच महापालिकेकडून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. ( bad road condition with potholes in city )