Bafna Jewellers Fraud Case : ठाणे जनता सहकारी बँकेची 38 कोटींची फसवणूक; नाशिकच्या प्रसिद्ध बाफणा ज्वेलर्सचे संचालक नीलेश बाफणा अटकेत, सराफ बाजारात खळबळ

What Is the ₹38 Crore Bafna Jewellers Fraud Case? : नाशिकमधील बाफणा ज्वेलर्सच्या संचालकांवर ठाणे जनता सहकारी बँकेची तब्बल ३८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
What is the Bafna Jewellers fraud case?

What is the Bafna Jewellers fraud case?

esakal

Updated on

नाशिक : शहरातील सराफी व्यवसायातील प्रसिद्ध मे. बाफणा ज्वेलर्सचे संचालक नीलेश सुभाष बाफणा यांना ठाणे जनता सहकारी बँकेची ३८ कोटींना फसवणूक केल्याप्रकरणी शहर आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. बनावट साठा विवरणपत्र सादर करीत ही फसवणूक (Bafna Jewellers fraud case Nashik) केल्याने ‘मे. बाफणा ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या चार संचालकांसह दोन जामीनदारांवर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोट्यवधीच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे सराफ बाजार आणि बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com