esakal
नाशिक : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी गावात काल संध्याकाळी घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मित्रांसोबत आनंद साजरा करण्यासाठी बाहेर पडलेले सात ते आठ तरुण काही वेळातच मृत्यूच्या दारात पोहोचले. पार्टीदरम्यान दारूच्या अति सेवनामुळे विषबाधा (Nashik Alcohol Poisoning) होऊन हे तरुण एकामागोमाग एक बेशुद्ध पडले.