इंदिरानगर, नाशिक: पाथर्डी-देवळाली रोडवरील रेस्टॉरंट व बारमुळे त्रास होत असल्याची कुरापत काढून महिलांसमवेत आंदोलन करणाऱ्या शिवसेना (उबाठा) नाशिक पश्चिम महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्याने बार मालकाकडे सात लाखांच्या खंडणीची मागणी केली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत संशयित श्रृती यतीन नाईक, यतीन नाईक (दोघे रा. मोरया बंगलो, ज्ञानेश्वरनगर, पाथर्डी-देवळाली रोड, नाशिक) यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.