Nashik Bazar Samiti : सभापती- उपसभापती निवडणुकीचा मुर्हूत ठरला! या तारखेला कार्यालयात होणार निवडणूक

Market Committee nashik
Market Committee nashikesakal

Nashik News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊन वीस दिवस उलटले आहेत.

या दरम्यान अनेक घडामोडी देखील घडल्या असून आता निवडणूक निर्णय अधिकारी नितिनकुमार मुंडावरे यांनी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. (nashik bazar samiti On 27 May election process for post of Chairman and Deputy Chairman will be held nashik news)

शनिवारी (ता.२७ ) बाजार समिती आवारातील सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया २८ एप्रिल रोजी पार पडून २९ रोजी निकाल जाहीर झाला. त्यानंतर सभापती व उपसभापती पदाची निवडणूक तत्काळ घ्यावी, अशी मागणी पिंगळे गटाच्या संचालकांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदन देऊन २४ तास उलटत नाही तोच पुन्हा बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीला स्थगिती देण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले. नंतर पुन्हा २४ तास उलटत नाही तोच सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया तत्काळ राबवावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले.

त्यामुळे अशा एक ना अनेक घडामोडी घडत असल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीला विलंब झाला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Market Committee nashik
Raj Thackeray : हे निर्णय देशाला परवडणारे नसतात; राज ठाकरे मोदी सरकारवर कडाडले!

परंतु आता निवडणूक निर्णय अधिकारी नितिनकुमार मुंडावरे यांनी व सभापती उपसभापती निवडणूक प्रक्रिया २७ मे रोजी घेण्याचे आदेश दिल्याने सभापती व उपसभापती निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून सत्ताधारी गटाने देखील निःश्वास सोडला आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

सभापती व उपसभापती निवडीची सभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नितिनकुमार मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार (ता.२७) रोजी सकाळी ११ वाजता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालय (मार्केटयार्ड, पंचवटी, दिंडोरी रोड, नाशिक) सभागृहात होणार आहे.

समिती सदस्यांची इतिवृत्त नोंद वहीत स्वाक्षरी घेणे वेळ ११ ते ११:१५, सभापती व उपसभापती पदाचे अर्ज वाटप ११:१६ ते ११:३५, सभापती- उपसभापती अर्जांची छाननी ११:३६ ते ११:४५, वैध अर्ज प्रसिद्ध ११: ५५, उमेदवारी अर्ज माघार ११:५६ ते १२:१५, अंतिम अर्ज यादी प्रसिद्ध १२:२० आवश्यकता असल्यास मतदान प्रक्रिया राबवणे १२:२१ ते १:२०, मतमोजणी प्रक्रिया लागलीच अन् त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल.

Market Committee nashik
ZP Teacher Transfer : 'गिरीश महाजनांकडे विनंती पण..',शिक्षकांना या तारखेपर्यंत बदलीच्या ठिकाणी व्हावे लागणार हजर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com