
नाशिक : देशासह परदेशात जाणाऱ्या इलेक्ट्रो उत्पादनांनी नाशिकला मोठा नावलौकिक प्राप्त केला आहे. क्रॉम्प्टन ग्रिव्हज, सिमेन्स, एबीबी, स्नायडर, टीडीके इप्कॉस या बहुराष्ट्रीय कंपन्यांसह असंख्य लहान, मोठ्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्या नाशिकमध्ये कार्यरत आहेत. इलेक्ट्रिकल उद्योगात स्विचगिअर, मोटार, जनरेटर, ट्रान्सफॉर्मर, केबल, ट्रान्समिशन टॉवर, इलेक्ट्रिकल उपकरणे बनवणारे उद्योग येतात.