लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार 'किसान क्रेडिट कार्ड' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kisan Credit Card

लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार 'किसान क्रेडिट कार्ड'

नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून ‘किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी’ ही मोहीम रविवारपासून १ मेपर्यंत राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये रविवारी विशेष ग्रामसभा होतील.

मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डसाठी विशेष ग्रामसभेत अर्ज उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच सहकार, महसूल, ग्रामविकास, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स विभाग, नाबार्ड आणि जिल्हा अग्रणी बँक या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

विशेष ग्रामसभेत पात्र शेतकऱ्यांनी भरून दिलेले अर्ज घेऊन सर्व संबंधित बँकांनी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड १ मेपर्यंत मंजूर होतील. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी १ मेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज भरून या योजनेचा लाभ घावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Nashik Beneficiary Kisan Credit Card Special Gram Sabha 24th April

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top