
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येथे कायमस्वरूपी भाविकांची गर्दी असते. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या अनेक भाविकांना रांगेत उभे राहावे लागत होते, त्यावर पर्याय म्हणून देवस्थानाने २ नोव्हेंबरपासून ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था केली आहे.
माणसी २०० रुपये देणगी दर्शनासाठी सुविधा करण्यात आली. यामुळे भाविकांसह व्यावसायिकांमध्ये समधानाचे वातावरण आहे. या योजनेमुळे भाविक देणगी दर्शनासाठीच रांगा लावत एका जागी गर्दी करू लागल्याने हा विषय सतत वादग्रस्त होऊ लागला होता.