
नाशिक : इडी, सीबीआय, ॲण्टी करप्शन, कस्टमच्या नावाचा वापर करून सर्वसामान्यांच्या जमापुंजीवर डल्ला मारण्याची संधी सायबर भामट्यांना देऊ नका. सायबर भामटे वापरत असलेल्या डिजिटल डिटेक्शनपासून सावधान राहण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले आहे. श्री. पाटील यांनी याबाबत आवाहन करणारी एक चित्रफित प्रसारित केली आहे.