Bharti Pawar and Bhaskar Bhagre.
Bharti Pawar and Bhaskar Bhagre.esakal

Nashik Lok Sabha Election: भारती पवार विरूध्द भास्कर भगरे यांच्यात सामना! महायुती, महाविकास आघाडीत आरोपांची राळ उठणार

Lok Sabha Election: महायुतीने पुन्हा भारती पवार यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी तीन वेळचे माजी जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे.

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Election : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी निवडणुक होत आहे. महायुतीने पुन्हा भारती पवार यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी तीन वेळचे माजी जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे. त्यामुळे दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीची रंगीत तालीम सरावातून प्रात्यक्षिक कडे मार्गक्रमण करत आहे. (Nashik Bharti Pawar vs Bhaskar Bhagre In Dindori Lok Sabha Constituency marathi news)

निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने नुकताच सर्व मित्रपक्षांसमवेत शेतकरी मेळावा घेत आपले हौसले बुलंद केले तर भाजप कार्यकर्ते मात्र वैयक्तिक गाठीभेटींवर भर देत आहे.जेव्हा मालेगाव धुळ्यात जाऊन दिंडोरी लोकसभा क्षेत्र नव्याने उदयास आला तेव्हा शरद पवार यांनी बारामतीनंतर सर्वात सुरक्षित मतदार संघ म्हणत नरहरी झिरवाळ यांना मैदानात उतरवले तर दुसऱ्यांदा भारती पवार यांना पवारांनी तिकीट देऊ केले.

दोन्ही वेळेला एकेकाळचे पवारांचे जोडीदार पण भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण विजयी झाले. गेल्या निवडणुकीत चव्हाण यांचे तिकीट कापून भाजपात आलेल्या भारती पवार यांना तिकीट देत त्याही विजयी झाल्या. आता दुसऱ्यांदा पुन्हा डॉ. पवारांना महायुतीने उमेदवारी दिली आहे. गेल्या तीन वेळेला तेव्हाच्या आघाडीने उमेदवारीबाबत अनेकवेळा घेतलेले लेट निर्णय भाजपच्या थेट पथ्यावर पडले.

प्रचार यंत्रणा, मुद्दे आणि मतदारसंघाचा आवाका गुजरात, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव यांच्या सिमांपर्यंत आहे. तत्कालीन राजकीय परिस्थिती बघता केवळ चांदवड -देवळा येथे भाजप तर नांदगाव येथे युतीत असताना शिवसेना आमदार निवडून आले. तर कळवण,येवला,निफाड व दिंडोरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले. सध्याच्या राजकीय परिस्थितीत सर्व आमदार महायुतीच्या गटात सामील झाले. (latest marathi news)

Bharti Pawar and Bhaskar Bhagre.
Nashik Lok Sabha Election : 383 पेक्षा जास्त उमेदवार असल्यास निवडणूक रद्द? जिल्हाधिकारी मागवू शकतात मार्गदर्शन

परंतु गेल्या दोन निवडणुकीत आमदार इतर पक्षांचे असतानाही भाजपने विजय मिळवला होता. यंदा राष्ट्रवादीने भास्कर भगरे यांना दौऱ्यावर पाठवत तालीम सुरू केली आहे. अद्याप त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. दोन्ही पक्ष कुठला अजेंडा घेऊन जनतेसमोर येतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. दिंडोरी लोकसभेचा बहुतांश भाग शेती निगडित असल्याने त्याबाबत दोन्ही गट कोणत्या विषयांच्या फैरी झाडणार याचीही उत्सुकता जनतेला आहे.

गेल्यावेळी माकपाचे माजी आमदार जे. पी. गावित उमेदवारी करत होते, ते यावेळी महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर होते. त्यांनीही मित्रपक्ष म्हणून दावेदारी सांगितली पण शरद पवार व इतर नेत्यांची सार्वजनिक प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

एकूणच सर्व बाबींचा विचार करता भाजप व महायुतीविरूध्द राष्ट्रवादी पवार गट व महाविकास आघाडी हे पुन्हा ठिकठिकाणचे मैदान गाजवणार आहेत. कडाक्याच्या उन्हात डोके शांत ठेऊन कोण लिंबू सारखा आंबट शिडकावा करतो आणि त्यात साखरेचा गोडवा कोण टाकतो हे येणाऱ्या दिवसात समजेल.

Bharti Pawar and Bhaskar Bhagre.
Nashik Lok Sabha Election : आचारसंहितेचा धसका अंमलबजावणी सुरु

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com