
नाशिक : मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी खासदार समीर भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सर्वच पुतण्यांचा ‘डीएनए’ सारखाच असल्याची प्रतिक्रिया दिली. (स्व.) बाळासाहेब ठाकरे, (स्व.) गोपीनाथ मुंडे व शरद पवार यांच्या संदर्भातील घडलेल्या राजकीय घटनांचा दाखला देताना भुजबळ यांनी वरील खोचक प्रतिक्रिया दिली. आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपांना न्यायालयात उत्तर देऊ, असेही त्यांनी सांगितले. (Bhujbal reacted sharply while citing political incidents related to Gopinath Munde and Sharad Pawar )