Nashik Accident News : औद्योगिक कामगारांवर काळाचा घाला ; 1 ठार दोघे अत्यवस्थ

Nashik News : सिन्नरच्या मुसळगाव औद्योगिक वसाहतीत कामाला जाणाऱ्या तिघा तरुणांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव येणाऱ्या स्विफ्ट कारने धडक दिली.
Sanket kate who died in the accident
Sanket kate who died in the accidentesakal
Updated on

Nashik News : सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सिन्नरच्या मुसळगाव औद्योगिक वसाहतीत कामाला जाणाऱ्या तिघा तरुणांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव येणाऱ्या स्विफ्ट कारने धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. (Nashik Accident News)

वावी येथील नितीन वसंत आनप, निमगाव मढ ता. येवला येथील संकेत बाळासाहेब काटे, व पांगरी येथील राहुल शिवाजी पगार हे तिघेजण दुचाकीवरून सिन्नरच्या मुसळगाव औद्योगिक वसाहती मधील रिंग गिअर्स या कंपनीत तिसऱ्या पाळीत कामासाठी चालले होते. तेथे ते कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते.

रात्री बारा वाजता ड्युटी असल्याने आनप व काटे हे दोघेजण वावी येथून अकरा वाजता निघाले. पांगरी येथून त्यांनी तिसरा सहकारी पगार याला सोबत घेतले. भोकणी फाट्याजवळ रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पाठीमागून भरधाव येणाऱ्या स्विफ्ट कार क्रमांक एमएच 02 बीएम 3057 ने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेमुळे दुचाकी दुभाजकावर धडकून विरुद्ध बाजूच्या लेनवर जाऊन पडली.

या अपघातात संकेत काटे (19) याचा डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाल्यामुळे जागेवरच मृत्यू झाला. तर इतर दोघांना मदतीसाठी धावलेल्या स्थानिक तरुणांनी उपचारासाठी हलवले. राहुल पगार यास सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात तर नितीन आनप यास नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (latest marathi news)

Sanket kate who died in the accident
Nashik Accident News : काकडगावजवळील रखडलेल्या पुलामुळे अपघात! 2 ठार, तर 3 गंभीर जखमी

जखमी झालेल्या या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर स्विफ्ट चालकाने वाहन जागेवर सोडून पळ काढला. रात्री उशिरा वावी पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात आणली.

या अपघातात मृत्युमुखी पडलेला संकेत काटे हा आयटी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. कॉलेजला दोन महिने सुट्टी असल्यामुळे तो वावी येथे असलेल्या नातेवाईकांकडे आला होता. सिन्नरच्या एमआयडीसीत दोन महिने काम करायचे व मिळालेले पैसे ऍडमिशनच्या कामाला येतील या उद्देशाने तो तीन दिवसांपासून रिंग गिअर्स कंपनीत कंत्राटी म्हणून कामाला जात होता. मात्र काळाने घाला घातल्याने त्याचे इंजिनियर होण्याचे स्वप्न अधुरे राहिले. निमगाव मढ ता. येवला येथे बुधवारी दुपारी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Sanket kate who died in the accident
Accident News : घराबाहेर झोपलेल्या कुटुंबाच्या अंगावर ट्रक उलटला; आठ जणांचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.