देवराई, वनराईत वाढले पक्ष्यांचे वास्तव्य!

देवराई, वनराईत वाढले पक्ष्यांचे वास्तव्य!
Published on: 
मेन लोगो : पक्षी सप्ताह विशेष फोटो : H34406, H34407, H34409, H34410 --- देवराई, वनराईत वाढले पक्ष्यांचे वास्तव्य ५५ ते ६० प्रजातींची नोंद; निसर्गसंवर्धनाच्या प्रयत्नांना यश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ४ : शहराच्या विस्तारणाऱ्या सिमेंटच्या जंगलात निसर्गाचे स्वतंत्र विश्व फुलविण्याच्या प्रयत्नांना आता पक्ष्यांच्या वाढत्या वास्तव्यामुळे यश मिळू लागले आहे. नाशिक देवराईने अकरा वर्षांचा प्रवास पूर्ण करून बाराव्या वर्षात पदार्पण केले आहे, तर नाशिक वनराईने दहा वर्षे पूर्ण करून अकराव्या वर्षात वाटचाल सुरू केली आहे. या दोन्ही ठिकाणी विविध वृक्ष, वनस्पती, झुडपे आणि नैसर्गिक अधिवास विकसित झाल्याने तब्बल ५५ ते ६० प्रजातींच्या पक्ष्यांचे दर्शन आणि वास्तव्य आढळून येत आहे. पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने नाशिकच्या निसर्गसमृद्धीचे हे चित्र विशेष लक्षवेधी ठरत आहे. शंभर एकरात विस्तारलेल्या देवराईमध्ये स्थानिक वृक्षसंपदा आणि नैसर्गिक अधिवास बहरत आहेत. दुसरीकडे, सुमारे ५५ एकर क्षेत्रातील नाशिक वनराईमध्येही वृक्ष, झुडपे, जलस्रोत आणि विविध वनस्पतींमुळे जैवविविधतेला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धनाच्या प्रयत्नांचे परिणाम आता पक्ष्यांच्या वाढत्या संख्येतून दिसू लागले आहेत. या परिसरात शृंगी घुबड, वनपिंगळा, पिंगळा, सर्पगरुड, स्वर्गीय नर्तक, शिपाई बुलबुल, चातक, इजिप्शियन स्कूप्स घुबड, ठिपक्या कवडा, रातवा, रानखाटीक, सुभग, लाल मनोली, युवराज, काळ्या डोक्याचा सराटी, पट्टकादंब आणि चकवा अशा वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, नाशिक वनराईमध्ये विविध जलचर पक्ष्यांचेही दर्शन घडत आहे. त्यामुळे या परिसरातील जलस्रोत पक्ष्यांसाठी अनुकूल अधिवास ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. पक्ष्यांची वाढती उपस्थिती ही निसर्गसंवर्धनाच्या प्रयत्नांना मिळालेली पावतीच आहे. पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने केवळ पक्ष्यांची ओळख करून न घेता त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याची जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे. निसर्गाला फुलण्यासाठी संधी दिली, तर तो किती समृद्ध होऊ शकतो, याचे जिवंत उदाहरण नाशिक देवराई आणि नाशिक वनराई ठरत आहेत. ---चौकट केवळ वृक्षारोपण नव्हे, अधिवासनिर्मिती महत्त्वाची! पक्ष्यांचे वास्तव्य निर्माण होण्यासाठी केवळ झाडे लावणे पुरेसे नसते. स्थानिक वृक्ष, फळझाडे, फुलझाडे, झुडपे, कीटक, पाण्याचे स्रोत आणि सुरक्षित अधिवास यांची नैसर्गिक साखळी विकसित होणे आवश्यक असते. नाशिक देवराई आणि वनराईमध्ये ही साखळी हळूहळू समृद्ध होत असल्याने पक्ष्यांसह अन्य जीवसृष्टीही आकर्षित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.