Maharashtra Municipal Electionsesakal
नाशिक
Nashik Election : नाशिकमध्ये भाजप प्रवेश सोहळा! महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय फेरबदल
BJP Surge in Nashik: Political Shifts Ahead of Elections : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशोत्सव सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपमध्ये या आठवड्यात मुंबई पक्ष कार्यालयात मोठ्या प्रमाणात अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.
नाशिक- शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेश सुरू झाले असताना आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशोत्सव सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपमध्ये या आठवड्यात मुंबई पक्ष कार्यालयात मोठ्या प्रमाणात अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. कोणाला पक्षात प्रवेश दिला जातो, याकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले असून, पक्षप्रवेशामधून नाशिक शहर व जिल्ह्याच्या राजकारणात मोठे फेरबदल निश्चित मानले जात आहेत.