नाशिक : महापालिकेत भाजपच्या शंभरहून अधिक जागा

दिवास्वप्न बघू नका; जयकुमार रावल यांचा शिवसेनेला टोला
bjp
bjpsakal

नाशिक : भाजपचा नाशिक हा बालेकिल्ला असून, यापुढेही तो कायम राहील. भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडून सत्ता काबीज करण्याचे स्वप्न शिवसेनेने बघू नये, त्यांचा भ्रमनिरास झाल्याशिवाय राहणार नाही. असा टोला भाजपचे नाशिकचे प्रभारी व माजी मंत्री जयकुमार रावल यांनी लगावला. पक्षात कुठलीच गटबाजी नसून, एकदिलाने सर्व काम करत असल्याचे सांगताना महापालिका निवडणुकीत शंभरपेक्षा अधिक जागा निवडून येतील असा दावा त्यांनी केला.

मागील आठवड्यात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भाजप नगरसेवक विशाल करंजकर यांनी भेट घेतली. याच सभेत खासदार राऊत यांनी भाजपचे अठरा नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्याला उत्तर देताना श्री. रावल यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपने संसदेत दोनवरून चारशेपर्यंत मजल मारली. मतदार भाजपवर निष्ठा असणाऱ्यांना मतदान करते. नाशिककरांची निष्ठा भाजपवरच आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महापालिकेत शंभरहून अधिक उमेदवार विजयी होतील.

bjp
Elgar Parishad : वरवरा राव यांना हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा

भाजप परिवारवादी पक्ष नसून, लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे. ठराविक नेत्यांनी चालविलेला भाजप हा पक्ष नसून, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. पक्षात कुठेही गटातटाचे राजकारण नाही. सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी एकोप्याने काम करत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत नाशिक महापालिकेत पुन्हा भाजपचीच सत्ता येईल. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, कल्याण आदी महापालिकांमध्येदेखील भाजप सत्ता स्थापन करून प्रस्थापितांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.

घोडामैदान जवळच

खासदार राऊत यांच्या दाव्याचा संदर्भ देताना श्री. रावल म्हणाले, कोणकोणत्या पक्षात जाणार यावर चर्चा करण्यापेक्षा घोडा- मैदान जवळ आहे. त्यावेळी कोण व किती कुठल्या पक्षात गेले हे विरोधकांना नक्कीच समजेल. त्यामुळे पक्षांतर हा विषय भाजपसाठी फारसा चिंतेचा नाही. भाजपचे मतदार एकनिष्ठ असतात व ते भाजपलाच मतदान करतात हा विषय जास्त महत्त्वपूर्ण आहे.

"इतर पक्षांतील अनेक नेत्यांना भाजपची विचारसरणी पटली असून, ते भाजपच्या वाटेवर आहेत. ते पक्षप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात योग्यवेळी, योग्य निर्णय भाजपच्या वाटेवर असलेल्या नेत्यांबाबत घेतला जाईल."

- जयकुमार रावल, नाशिक शहर भाजप प्रभारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com