
Aanandacha Sidha : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिध्याची प्रतीक्षा संपली आहे. ११ तालुक्यांत त्याचे वाटप सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात दाखल झालेल्या वस्तूंपैकी सर्व वस्तू केवळ येवला तालुक्यात वितरित करण्यात येत असून, पुरवठामंत्र्यांचा मतदारसंघ असल्याने त्याला प्राधान्य दिल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. सण-उत्सवांच्या काळात जनतेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी राज्य सरकारने शंभर रुपयांत आनंदाचा शिधा ही योजना सुरू केली. जिल्ह्यात एकूण आठ लाख ५४ हजार ६५८ लाभार्थ्यांना शंभर रुपयांत शिधा म्हणजेच आनंदाचा शिधा वाटप होते. (Blessings of people of Yeola Taluka in distribution of Anandacha Shida )