नाशिक : लाच घेणारा कनिष्ठ अभियंता ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात | Bribe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe

नाशिक : लाच घेणारा कनिष्ठ अभियंता ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) रचलेल्या सापळ्यात रोख रकमेची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ पकडले आहे. गौरव सूर्यकांत गवळी असे सदर अभियंत्याचे नाव आहे.

पोलिस पडताळणीला गेले अन् आरोपीला घेवून आले

सिन्नर तालुक्यातील कासारवाडी येथे आरो प्लांट (RO plant) बसवण्यासाठी तांत्रिक पूर्तता करून देण्याच्या बदल्यात गवळी याने 15 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. ॲन्टी करप्शन ब्युरो नाशिकचे उप-अधीक्षक अभिषेक पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. हे लोक लाचेची मागणी कशी करतात याची पडताळणी करण्याच्या सुचना श्री. पाटील यांनी दिल्या आपल्या सहकाऱ्यांना दिल्या. त्यांच्या सुचनेने या लाचखोर अभियंत्याला पकडण्यासाठी सापळा रचला गेला. पंचांसमवेत तक्रारदार गवळी यास भेटण्यासाठी गेले. 15 हजारांची लाच मागणाऱ्या अभियंत्याला 10 हजार रुपये घेण्याची विनंती केली असता त्याने ती मान्य केली. शुक्रवारी सायंकाळी उप-अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या सुचनेने 2 हजारांच्या 5 नोटांना अन्थ्रासीन पावडर लावून गवळीच्या ताब्यात देण्यात आले. फिर्यादींच्या सोबत असलेले पंच साक्षीदार पिंजारघरे यांनी गवळी यास 7 वाजेच्या सुमारास दहा हजारांची रोख लाच घेताना रंगेहाथ पकडलेे. ॲन्टी करप्शन ब्युरो नाशिकचे उप-अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाने पुढील कारवाई केली जात आहे.

हेही वाचा: नाशिक : वैद्यकीय विभागाला कोरोनाचा विळखा

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikbribeBribe case
loading image
go to top