Allegation of construction of shop in parking lot constructed without consent
Allegation of construction of shop in parking lot constructed without consentesakal

Nashik News : संमती न घेताच पार्किंगमध्ये बांधले गाळे? भाऊ फक्त नावाला नगर अभियंताच खरा बिल्डर

Nashik : येथील पंचवड नगरमधील एका राहिवासी अपार्टमेंट बांधकामास २०२१ साली मंजुरी दिल्यानंतर मालकाने पहिला प्लॅन दाखवत ते सर्व फ्लॅट विकले.

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील पंचवड नगरमधील एका राहिवासी अपार्टमेंट बांधकामास २०२१ साली मंजुरी दिल्यानंतर मालकाने पहिला प्लॅन दाखवत ते सर्व फ्लॅट विकले. त्यावेळी तळमजला पूर्ण पार्किंग दाखवली असताना फ्लॅटधारकांची संमती न घेता दुसरा परवानगी अर्ज टाकून परस्पर गाळे बांधल्याचा आरोप फ्लॅटधारकांनी केला आहे. (Nashik builder shop built in parking lot without permission in ozar marathi news)

येथील गट नंबर २४१२/१/२ मधील सुदर्शन क्षीरसागर यांनी ‘एनएमआरडीए’ ने मंजुरी दिल्यानुसार राजहंस अपार्टमेंट बांधले. सहा फ्लॅटची स्कीम प्लॅनमध्ये तर तळ मजला पार्किंग होती. काही दिवसांनी बिल्डिंग मालकाच्या भावाने ओझर नगर अभियंता म्हणून सूत्रे हातात घेत खाली दोन गाळे बांधून सुधारित आराखडा परवानगीसाठी दाखल केला. त्यावर फ्लॅट मालकांनी मोफा कायद्यातील भाग ७ अंतर्गत मुद्दा एक व दोनचा आधार घेत हरकत नोंदवली.

त्यावर क्षीरसागर यांनीही आक्षेप घेत १७७६ दस्त नोंदीवेळी गाळे समाविष्ट करण्याचे राहून गेल्याचा तलाठी यांच्याकडे जबाब दिला. तो त्यांनी लागलीच फेटाळून लावला. याचे कारण म्हणजे दुसरा प्लॅन दाखल करण्यापूर्वीच त्या सहा जणांना फ्लॅट विकले गेले होते. परंतु कुणाचीही संमती न घेता पार्किंगमध्ये अतिक्रमित गाळ्यांवर आपला निर्णय देत अर्ज नगरपरिषदेने निकाली काढल्याने मोठी फसवणूक झाल्याची भावना फ्लॅटधारकांनी व्यक्त केली.

कामांच्या चौकशीची विनंती

बिल्डर्स व्यवसाय ज्याच्या नावे आहे त्यांचे भाऊ भालचंद्र ऊर्फ धनंजय क्षीरसागर यांनी ओझर नगर अभियंता म्हणून १२ एप्रिल २०२२ रोजी पदभार स्वीकारला अन् लगेच १५ जून रोजी आपलाच दुसरा प्लॅन मंजुरीस टाकला. पण त्याआधीच सगळे फ्लॅट विकून झाल्याने त्या सहा जणांची संमती घेणे क्रमप्राप्त होते.  (latest marathi news)

Allegation of construction of shop in parking lot constructed without consent
Nashik News : ‘पांजरपोळ’च्या 1600 गायींना प्रतिदिन 20 टन चारा! दुष्काळातही सेवाभाव वृत्ती कायम

पण अधिकार स्वहातात असल्याने त्यांनी त्याचा गैरवापर करत आधीचा प्लॅन परस्पर बदलून दुसऱ्याची मंजुरी घेत सरकारी खुर्चीला कलंक लावल्याने त्यांच्या काळातील इतरही कामांच्या चौकशीची विनंती फ्लॅटमालक यतीन सोनवणे, नितीन रासकर यांनी केली. तसेच ओझर हे महानगरकडे आगेकूच करत असताना स्थानिक रहिवासी म्हणून क्षीरसागर यांनी भविष्याचा वेध घेत काही ठिकाणी गुंतवणूक केल्याची चर्चा रंगली असून या अधिकाऱ्यावर नेमका कुणाचा वरदहस्त आहे, याचीही झडती घेण्याची मागणी होत आहे.

मुख्याधिकारी उपलब्ध नाही

ओझर नगरपरिषद येथे तीन दिवस झाले मुख्याधिकारी आलेच नाहीत. कलेक्टर ऑफिस मीटिंग, येवल्यात कामं, तेथील अपील असल्याने ते आले नसल्याचे समजले. यामुळे वरिष्ठ अधिकारी ओझरला वाली कधी देणार हा मुख्य प्रश्न आहे.

''त्या सर्व फ्लॅटधारकांनी अर्ज केला होता. तो आम्ही निकाली काढला असून पार्किंगमधील बांधलेल्या गाळ्यांबाबत काही आक्षेप असल्यास इतरही सरकारी सोपस्कार आहेत. त्यामुळे त्यांनी अपील करावे.''- स्नेहा फडतरे, प्रशासकीय अधिकारी, ओझर नगरपरिषद.

''बांधलेल्या दोन गाळ्यांना नगरपरिषदेने परवानगी दिली आहे. मी चुकीचे काम केलेले नाही. माझा भाऊ सुदर्शन क्षीरसागर बिल्डर आहे. त्यानेच राजहंस अपार्टमेंट बांधले आहे. त्यामुळे जे आहे ते नियमात आहे.''- भालचंद्र (धनंजय) क्षीरसागर, मालकाचे बंधू तथा नगर अभियंता, निफाड/चांदवड

Allegation of construction of shop in parking lot constructed without consent
Nashik News : ‘मॉडेल रोड’साठी 2025 पर्यंत एकेरी वाहतूक! सीबीएस ते कॅनडा कॉर्नर वाहतूक मार्गात बदल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com