
ओझर : नाशिकहून धुळ्याकडे एसटी बसमध्ये प्रवाशी घेऊन जात असताना बसचालकाच्या छातीत अचानक दुखू लागल्याने चालकाने प्रसंगावधान साधत अपघात होऊ नये म्हणून बस ताबडतोब रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली. ही बाब वाहतूक सुरळीत करणाऱ्या पिंपळगाव टॅबच्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली ते धावतच एसटी कडे गेले व चालकाने माझ्या छातीत दुखत असल्याचे सांगितले.