There is a rush of passengers to go out on the occasion of Bhaubij at the bus station.esakal
नाशिक
Nashik News : तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांची कसरत; बाहेरगावी जाण्यासाठी बसस्थानक, रेल्वेस्थानकात गर्दी
Latest Nashik News : दिवाळीचा हंगाम सुरू असताना पर्यटन व इतर विविध कारणांनी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे.
नाशिक रोड : दिवाळीचा हंगाम सुरू असताना पर्यटन व इतर विविध कारणांनी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे. दिवाळी उत्सवात लक्ष्मीपूजनानंतर माहेरवाशीनींना माहेरचे वेध लागतात. आपल्या चिमुकल्यांसह घराकडे निघालेल्या महिला प्रवाशांनी शहरातील बसस्थानके गजबजली होती. बच्चे कंपनीमध्ये चांगला उत्साह पाहायला मिळाला. प्रवाशांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जादा बसगाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. (Bus stand and railway stations are crowded to get tickets due to diwali holiday )