Crime
sakal
नाशिक: शहरातील बसस्थानकांमध्ये बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्समधील व गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. शहर गुन्हे शाखेच्या अंबड गुन्हे शाखेने ही कारवाई करीत संशयित महिलेकडून साडेचार लाखांचे दागिने जप्त केले. निर्मला विजय लोंढे (३८, रा. तिरुपती नगर, खर्जुल मळा, टाकळी रोड, नाशिक. मूळ रा. जाजूवाडी, मालेगाव कॅम्प) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे.