Nashik Police : शहरातील अंबड, भद्रकालीत 40 संवेदनशिल बुथवर असेल ‘कॅमेऱ्या'ची नजर! पोलिसांकडून ठोस उपाययोजना

Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा न पोहोचता मतदान प्रक्रिया पार पाडण्याची मुख्य जबाबदारी शहर पोलिस यंत्रणेवर आहे.
Poling Booth Camera
Poling Booth Cameraesakal

Nashik Police : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा न पोहोचता मतदान प्रक्रिया पार पाडण्याची मुख्य जबाबदारी शहर पोलिस यंत्रणेवर आहे. शहरात संवेदनशिल असलेल्या मतदार बुथची पाहणी पोलिसांकडून करण्यात आली असून, मतदानावेळी त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठीच्या ठोस उपाययोजना करण्यात येणार असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह सशस्त्र पोलीस तैनात करण्यात येणार आहे. (Nashik Camera on 40 sensitive loksabha election booths news)

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून (ता. २६) नामनिर्देशन पत्र सादर करण्यास प्रारंभ होणार आहे, तर २० मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहर पोलिसांनी शहरातील मतदान केंद्रांची माहिती संकलित करून यापूर्वीच्या माहितीनुसार, संवेदनशिल मतदान केंद्र निश्चित केले आहेत.

यामध्ये आयुक्तालयाच्या परिमंडळ एकमध्ये १७ संवेदनशिल मतदान बुथ तर, परिमंडळ दोनमध्ये २३ संवेदनशिल मतदान बुथ आहेत. परिमंडळ एकमधील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतच सर्व संवेदनशिल मतदान बुथ आहेत. त्याचप्रमाणे, आयुक्तालय हद्दीत सर्वाधिक संवेदनशिल मतदान बुथ परिमंडळ दोनमधील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आहेत.

परिमंडळांच्या उपायुक्तांनी या संवेदनशिल मतदान केंद्रांना भेटी देत पाहणी केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून करण्यात येणाऱ्या उपाययोजनाही निश्चित केल्या आहेत. संवेदनशिल केंद्रांच्या ठिकाणी यापूर्वीच्या घटनांचाही आढावा पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांच्या आढावा बैठकीत घेतला आहे.

त्यानुसारही या संवेदनशिल मतदार केंद्रांवर ठोस उपाययोजना करण्यासंदर्भातील गोपनीय माहिती परिमंडळ उपायुक्तांकडून पोलीस आयुक्तांना देण्यात आली आहे. त्यानुसार, या मतदार केंद्रांवर सुरक्षात्मक उपाययोजना केल्या जाणार आहेत. (latest marathi news)

Poling Booth Camera
Nashik Women Police: गुन्हेशोध पथकांमध्ये दिसणार महिला पोलीस! पोलीस आयुक्तांचा आदेश; पुरुष मक्तेदारीला छेद

या आहेत उपाययोजना

- संवेदनशिल मतदान केंद्रांवर उपद्रवी ठरू पाहणार्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई

- अशा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी

- एकाच इमारतीत अधिकचे बुथ असल्यास मतदारांना येण्या-जाण्यासाठीचा सुरक्षित रस्ता

- सुरक्षेसाठी पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त

- वेळप्रसंगी सशस्त्र पोलीस तैनात

- गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस तैनात

"संवेदनशिल मतदान केंद्रांचा सातत्याने आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे."

- किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक.

Poling Booth Camera
Nashik Police : रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक ‘ॲक्शन’! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त आक्रमक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com