arrest sakal
नाशिक
Nashik Crime : भांग विक्रेत्या पान टपरीचालक जेरबंद; भद्रकाली अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई
Latest Nashik News : शहरात एमडी अमलीपदार्थ (मॅफेड्रॉन), गांजा अन् चरसची तस्करीचे गुन्हे उघडकीस आल्यानंतर पान टपरीवरून भांग विक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक : शहरात एमडी अमलीपदार्थ (मॅफेड्रॉन), गांजा अन् चरसची तस्करीचे गुन्हे उघडकीस आल्यानंतर पान टपरीवरून भांग विक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहर गुन्हेशाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने भद्रकालीतून एका पान टपरीचालकाला ताब्यात घेत त्याच्याकडून सुमारे तीन हजारांच्या भांगेच्या गोळ्या जप्त केल्या आहेत.

