Nashik News : डोंगरावर नसला, तरी कागदावर मुबलक चारा; नांदगाव तालुका कृषी विभागाची बेफिकिरी

Nashik : शासकीय रुटीन असते मात्र अद्यापही तालुका कृषी विभागाकडून पशुसंवर्धन विभागाला कुठल्याही प्रकारचा डेटा पाठविला गेला नसल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे.
fodder
fodderesakal

Nashik News : तालुक्यातील पशुधनासाठी आवश्यक असणारी चाऱ्याची गरज भागविण्यासाठी उपाययोजनांना चालना देण्यासाठी वस्तुस्थितीदर्शक अभिप्रायाची आवश्यकता असते, ते शासकीय रुटीन असते मात्र अद्यापही तालुका कृषी विभागाकडून पशुसंवर्धन विभागाला कुठल्याही प्रकारचा डेटा पाठविला गेला नसल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. (Carelessness of Nandgaon Taluka Agriculture Department)

यावर येत्या मंगळवारपर्यंत खरीप व रब्बी हंगामात किती प्रमाणात चारा उपलब्ध झाला याची माहिती पशुसंवर्धन विभागाला देण्यात येईल अशी माहिती तालुका कृषी अधिकारी आर. आर. डमाले यांनी दिली. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने माणसासोबत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यात विशेष म्हणजे अवघा ६४ टक्के पाऊस झालेल्या तालुक्यात घाटमाथ्यावर काही भाग वगळता सर्वत्र जेमतेम पिके हाती आली.

या पिकांमुळे किती प्रमाणात चारा उपलब्ध झाला, याची कृषी विभागाने तहसीलदार व तालुका पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती कळविणे हा संकेताचा भाग असूनही हाती आलेली पिके व चारा याचा ताळमेळ घालून पशु संवर्धन विभाग आपल्या पशुगणनेनुसार किती मेट्रिक टन चारा लागतो याचे नियोजन तहसीलदारांना कळवित असतात.

तालुका पशु वैद्यकीय विभागातल्या आठ मंडळातील पशुधनाची संख्या व त्यासाठी लागणारा चारा याचा आरखडा तयार करण्याचे काम मात्र रेंगाळले आहे. एप्रिल संपला तरीही अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे नियोजन तालुका कृषी विभागाला कळविता आले नसल्याने नजीकच्या काळात चारा छावण्या सुरु करण्याला अडथळा उभा राहिला आहे. (latest marathi news)

fodder
Nashik News : जिल्ह्यात एक हजार 73 उद्योजकांना उभारी; उद्योग केंद्राच्या माध्यमातून 50 कोटींची गुंतवणूक

डोंगर व शिवारात कुरण नसले तरी कृषी विभागाच्या कागदावर सगळं कस हिरवेगार असावे अशी स्थिती दिसून येत असल्याने तालुक्यातील पशुधनाची चाऱ्याची गरज कशी भागवावी असा प्रश्न पशुपालक शेतकऱ्यांना पडला आहे. तालुक्याच्या अनेक गावांमध्ये यावर्षी पावसाळ्यातच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने खरीप हंगामातील मका, बाजरी, कडवळ, हत्ती घास, मेथी घास आदी पिके हातची निघून गेली.

त्यामुळे जनावरांसाठी लागणारा हिरवा चारा उपलब्ध व्हावा यासाठी तालुकाबाहेरून चारा मागविला जात आहे. शेजारच्या येवला तालुक्यातून मोठ्या प्रमाणात चारा मागविण्यात आला. त्याची काही प्रमाणात साठवणूक करण्यात आली. रब्बीत मका काढण्यात आला, त्यातून जेमतेम चारा मिळाला, आता पशुधन सांभाळणारे एकमेकांच्या नातेवाइकांकडे चारा मिळेल का चारा? याबाबत विचारणा करताना दिसत आहेत. हिरवा चाराच उपलब्ध होत नसल्याने, पशुपालक जनावरे जागविण्यासाठी, चारा म्हणून जनावरांना ऊस देत आहेत.

असे सोसलेत जनतेने दुष्काळाचे चटके

हातउसने करीत यंदाच्या खरीप हंगामाची तयारी केली, एकामागे एक अशी सगळी नक्षत्रे कोरडी गेली अन पावसाने हुलकावणी दिली. खरीप डोळ्यादेखत हातचा गेला, शासन दप्तरी मात्र तालुक्याच्या एकूण खरिपाच्या साठ हजार ८१४ हेक्टरपैकी अवघ्या पन्नास हजार हेक्टरात मागेपुढे अशा एकूण ८० ते ८५ टक्के एवढ्याच पेरण्या झाल्याची नोंद झाली. तालुक्याची अंतिम नजर आणेवारी छत्तीस पैसे आहे. तालुक्यात ३१५ मिली पाऊस झाल्याची नोंद आहे. सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण ६४ टक्के आहे.

fodder
Nashik News : गोदावरी काँक्रिटीकरणविरोधात अवमान याचिका! महापालिका, स्मार्टसिटी कंपनीला नोटीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com