
नाशिक : बागलाणमधील नाशिक जिल्हा विधायक कार्यकारी समितीने बेकायदा भरती प्रक्रिया राबविल्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव व संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील यांच्यावर सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भरती प्रक्रिया राबविली तेव्हा नितीन बच्छाव माध्यमिक शिक्षणाधिकारी होते. सध्या ते प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.