
मालेगाव / वडनेर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांतर्फे ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. नामपुर- मालेगाव रस्त्यावरील सावतावाडी येथे स्थिर नियंत्रण पथकाने व पोलिसांनी चारचाकी वाहनाची (एमएच ४१ बीएन १३४३) तपासणी केली असता सदर वाहनातून १४ लाख रुपये रोख रक्कम मिळून आली. अंबासन (ता. बागलाण) येथील व्यापारी ऋषिकेश भामरे (वय २४) हे मालेगावहून नामपूरकडे जात होते. (Cash on 14 lakh seized in Malegaon )