
नाशिक : येथील नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत बघायला मिळत आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये भाजपच्या देवयानी फरांदे यांनी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये मतांची आघाडी घटली. सोळाव्या फेरी अखेर भाजपाच्या फरांदे यांना पंधरा हजार मतांची विजयीआघाडी आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघासाठी सकाळी आठ पासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली.