
नाशिक : महाविकास आघाडी म्हणून एकसंध लढायचे आहे. आघाडी असल्याने तडजोडीही कराव्या लागणार. मात्र, शहरात आमचे अस्तित्व राहणार नसेल तर काय होणार, यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्या. काहीही करा आणि नाशिक मध्य मतदारसंघ काँग्रेसला सोडा, अशी साद पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षनिरीक्षकांना घातली. तर, कार्यकर्त्यांच्या भावना दिल्लीतील राष्ट्रीय नेत्यांपर्यंत पोचविल्या जातील, असे नाशिकचे पक्षनिरीक्षक परेश धानानी यांनी सांगितले. (central Congress leave determination meeting workers appeal to party inspectors )