Higher Education Admission : अभियांत्रिकीसाठी उद्यापासून, फार्मसीला गुरुवारपासून प्रवेश

Nashik News : विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याच्‍या संभाव्‍य तारखांची घोषणा सीईटी सेलने केली आहे. त्‍यानुसार अभियांत्रिकीसाठी बुधवार आणि फार्मसीसाठी गुरुवार पासून नोंदणीला सुरवात होईल.
Higher Education Admission
Higher Education Admission esakal

Nashik News : बारावीचा निकाल जाहीर होऊन महिना उलटला. सीईटी परीक्षांचे निकालही जाहीर झाले. तरीदेखील व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशप्रक्रियेला सुरवात होत नसल्‍याने विद्यार्थी, पालक चिंतातुर झाले होते. परंतु आता विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली असून, विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याच्‍या संभाव्‍य तारखांची घोषणा सीईटी सेलने केली आहे. (CET Cell announced dates for start of admission process for various courses)

त्‍यानुसार अभियांत्रिकीसाठी बुधवार (ता. १०) आणि फार्मसीसाठी गुरुवार (ता. ११)पासून नोंदणीला सुरवात होईल. बारावीच्‍या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे वेध लागले आहेत. परीक्षेचा निकाल जाहीर होऊन व सीईटीचे निकालदेखील जाहीर झालेले असताना प्रवेशप्रक्रिया सुरू होत नव्‍हती.

टप्प्‍याटप्प्‍याने प्रवेशप्रक्रियांना प्रारंभ होत आहे. त्‍यानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सद्यःस्‍थितीत नऊ व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशप्रक्रियेला सुरवात झालेली आहे. याशिवाय थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी आणि कृषी प्रवेशासाठीदेखील नोंदणी सुरू झाली आहे. त्‍

यापाठोपाठ उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या पदवी व पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याच्‍या संभाव्‍य तारखांची घोषणा सीईटी सेलने केली आहे. एकूण २० अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशाला येत्‍या दोन-तीन दिवसांत सुरवात होणार आहे. त्‍यामुळे आता काहीसे निश्‍चित झालेल्‍या विद्यार्थी, पालकांची येत्‍या आठवड्यापासून प्रवेश घेण्यासाठीची दगदग सुरू होणार आहे. (latest marathi news)

Higher Education Admission
Nashik News : आयुक्तालयातील प्रभारींवर ‘खांदेपालटा’ची टांगती तलवार; सहायक आयुक्तांमध्ये फेरबदलाची चर्चा

‘मॅनेजमेंट’ची जागा ‘लाख’मोलाची

विविध कारणांनी ऐच्‍छिक अभ्यासक्रमास प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्याचा आधार घ्यावा लागत आहे. याअंतर्गत राखीव जागांच्‍या तुलनेत प्रवेशोच्‍छुक विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्‍याने या कोट्याला चांगलेच मोल आले आहे. विशेषतः अभियांत्रिकी शाखेत कॉम्प्युटर, आयटी यांसह आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स ॲन्ड डेटा सायन्‍स, बी.एस्सी. कॉम्‍प्‍युटर या अभ्यासक्रमांना, तसेच औषधनिर्माणशास्‍त्र शाखेच्‍या डी. फार्मसी, बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी ‘लाख’मोलाच्‍या मदतीने प्रवेश निश्‍चित करावे लागत आहेत.

अभ्यासक्रमनिहाय प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याच्‍या संभाव्‍य तारखा

- तंत्रशिक्षण विभाग

एमबीए ------- ९ जुलै

एमई/एम.टेक --- ९ जुलै

बीई/बी.टेक ----- १० जुलै

बी.फार्म./फार्म डी. --- ११ जुलै

एम.फार्म ----------- १३ जुलै

थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी --- १६ जुलै

थेट द्वितीय वर्ष फार्मसी --------- १६ जुलै

Higher Education Admission
Nashik ZP News : यंदाच्या सुपर 50 उपक्रमात 110 विद्यार्थ्यांना संधी; 21 जुलै रोजी होणार निवड चाचणी

उच्च शिक्षण विभाग

एलएलबी पाच वर्षे ---------------- ८ जुलै

बीए-बी.एस्सी. बी.एड. -------------८ जुलै

बीएड-एम.एड. ------------------- ८ जुलै

एलएलबी तीन वर्षे ------------ १० जुलै

बीपी.एड./एमपी.एड. ----------- ११ जुलै

बी.एड. तसेच एम.एड. -------- १२ जुलै

Higher Education Admission
Nashik Railway : सलग दुसऱ्या दिवशी ‘पंचवटी’सह अनेक गाड्या रद्द! नाशिकच्या प्रवाशांचे हाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com