CET Exam Result : शिक्षणशास्‍त्र अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर

CET Exam : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी घेतलेल्‍या विविध सीईटी परीक्षांपैकी शिक्षणशास्‍त्र शाखेच्‍या अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षांचे निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाले आहेत.
CET Exam Result
CET Exam Resultesakal

CET Exam Result : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी घेतलेल्‍या विविध सीईटी परीक्षांपैकी शिक्षणशास्‍त्र शाखेच्‍या अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षांचे निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाले आहेत. सीईटी सेलतर्फे या परीक्षा झाल्‍या होत्‍या. ऑनलाइन पद्धतीने संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) घेतलेल्‍या परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास सुरवात झाली आहे. (nashik CET exam results for education courses announced )

पहिल्‍या टप्प्‍यात २ मार्चला घेतलेल्‍या एम. एड. सीईटी आणि बी.एड. एम.एड. (३ वर्षे इंटिग्रेटेड) या शिक्षणक्रमांच्‍या सीईटी परीक्षेचा निकालाचा समावेश आहे. तसेच ३ मार्चला झालेल्‍या एम.पीएड. या पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमाची आणि ७ मार्चला झालेल्‍या बी.पी.एड. या पदवी अभ्यासक्रमांच्‍या सीईटीचा निकाल जाहीर झाला आहे. (latest marathi news)

CET Exam Result
CET Exam Result : सीटीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

एलएलबी सीईटी निकालाची प्रतीक्षा

पदवीनंतर तीन वर्षे कालावधीच्‍या एलएलबी अभ्यासक्रमाच्‍या सीईटी परीक्षा मार्च महिन्‍यात पार पडली होती. या सीईटीचा निकाल जाहीर करण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली असून, येत्‍या काही दिवसांत निकाल जाहीर होऊ शकतो. दरम्‍यान या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागून असणार आहे.

CET Exam Result
CET Exam Result : सेजल राठी सीईटी परिक्षेत महाराष्ट्रात प्रथम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com