नाशिक- शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत जबरी चोऱ्यांसह लुटमारीच्या घटना सातत्याने घडत असून, चोरट्यांना आळा घालण्यात पोलिसांना अपयश येत आहे. म्हसरूळ हद्दीत महिलेसह युवकाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी खेचून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन घटनांमध्ये मोबाईल हिसकावून नेल्याचाही प्रकार घडला.